मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या दोघांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही प्रतिदिन गोहत्या होत आहेत, हे चिंताजनक आहे. गोहत्या रोखण्यासाठी गोरक्षक करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पोलिसांनी त्यांचा आदर्श ठेवावा, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे, २६ सप्टेंबर – मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना संगमनेर येथून गोमांस अवैधरित्या पुणे-नाशिक रोडने मुंबईकडे जाणार आहे, अशी बातमी मिळाली असता गोरक्षक कृष्णा माने आणि त्यांचे सहकारी यांनी नारायणगाव पोलिसांच्या साहाय्याने गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या एका आयशर टेम्पोला कह्यात घेऊन ४ सहस्र ५०० किलो वजनाचे अनुमाने ६ लाख ७५ सहस्र मूल्याचे गोवंशियांचे मांस जप्त केले आहे. कृष्णा माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून रियाजऊद्दीन खान आणि गणेश या दोघांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.