पुणे – येथील सिंहगड रस्त्याच्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती नुकतेच झाले. त्या वेळी अजित पवार यांनी कंत्राटदारांना चेतावणी देत हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले, तसेच लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशी चेतावणीही त्यांनी कंत्राटदारांना दिली. लागेल ते साहाय्य करण्यासाठी मी तयार असेन, असेही पवार यांनी सांगितले.