जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट दिल्या १५७ प्राचीन भारतीय कलाकृती !

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कलाकृती आणि पुरातन वस्तू कोणत्याही देशाचा अमूल्य ठेवा आहे. अशा कलाकृती आणि वस्तू यांची होणारी चोरी, करण्यात येणारा अवैध व्यापार अन् तस्करी यांचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका कटीबद्ध आहेत.

इटावा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतराच्या आरोपावरून पाद्री पोलिसांच्या कह्यात !

येथील ईकरी भागातील एका घरामध्ये लोकांचे धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आल्यावर पोलिसांनी या पाद्र्याला कह्यात घेतले.

भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावे ! – अमेरिका

भारताचा समावेश असलेल्या ‘क्वाड’ सदस्य देशांचीही (अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया) यास सहमती आहे.

शिरोली ते सांगली रस्ता ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित’ करून तो ६ मासांत पूर्ण करणार ! – नितीन गडकरी

रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते सांगलीपर्यंतचा रस्ता हा ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित’ करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रहित करा ! – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

महापुराच्या काळात पुराचे पाणी या बंधार्‍यांमुळे संथगतीने अल्प होते.

‘न्यासा’ आस्थापनाची चौकशी करून दोषींवर कारवाईची करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

‘न्यासा’ संस्थेच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागातील विविध पदांची परीक्षा रहित !

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत करापोटी ‘राष्ट्रीय लोक अदालती’तून १५ कोटी रुपयांची वसुली !

याचा लाभ जिल्ह्यातील १ सहस्त्र ३९९ ग्रामपंचायतींना झाला.

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घेतली पीडित आणि कुटुंबीय यांची भेट

महाबळेश्वर येथील महिलेवरील अत्याचाराचे प्रकरण

संभाजीनगर येथे खराब भ्रमणभाष संच परत करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन !

सरकारकडून अंगणवाडी सेविकांना दिलेले भ्रमणभाष संच लगेच कसे बंद पडतात ? तसेच अंगणवाडी सेविकांनी वारंवार मागणी करूनही प्रशासन त्यावर उपाययोजना का काढत नाही ? याविषयी संबंधित अधिकारी आणि भ्रमणभाष संच पुरवणारे ठेकेदार यांची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही अपेक्षा !

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा चालतात, मग साहित्य संमेलन का नाही ? – कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद  

२५ सप्टेंबर या दिवशी ‘मराठवाडा साहित्य संमेलना’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.