भिवंडी येथे बनावट नोटा बनवणारी टोळी अटकेत !

बनावट नोटा बनवून त्या चलनात आणण्याच्या सिद्धतेत असलेला अहमद नाजम नाशिककर (वय ३२ वर्षे) आणि चेतन एकनाथ मेस्त्री (वय ४१ वर्षे) या दोघांना भिवंडी येथील शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एका हिंदु तरुणीची प्रशासकीय अधिकारीपदी निवड !

पाकमध्ये हिंदु तरुणी जरी प्रशासकीय अधिकारी बनली, तरी तिला मोकळ्या वातावरणात काम करायला मिळेल का ? ‘पाकमधील हिंदु महिलांचाही सन्मान केला जातो’, हे दाखवण्यासाठी पाकमध्ये अशा नियुक्त्या होतात, हे स्पष्ट आहे

‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची क्षमा मागून ‘कन्यादाना’विषयीचे आक्षेपार्ह विज्ञापन मागे घ्यावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या आस्थापनाच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असे धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारे विज्ञापन केले. ते अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे ठरत आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सर्वाेच्च न्यायालयाचे अतिरिक्त महाधिवक्ता एन्. व्यंकटरमण् यांची सदिच्छा भेट !

देहली येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला प्रारंभ

घरीच स्थानबद्ध करण्याच्या सचिन वाझे यांच्या मागणीवर अन्वेषण यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश !

हृदयावरील शस्त्रकर्म झाले असल्यामुळे प्रकृती ठीक होईपर्यंत घरी स्थानबद्ध ठेवण्याच्या सचिन वाझे यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. सचिन वाझे यांनी याविषयीचा अर्ज न्यायालयात केला आहे.

महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्येविषयी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले !

रस्त्यांच्या कामांविषयी न्यायालयाला सातत्याने सांगावे लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !

‘पितृऋण’ फेडण्यासाठी ‘श्राद्ध करणे’ आणि प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी : शंका अन् समाधान’ या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबण्याची राहुल गांधी यांची सूचना ! – दिनेश गुंडू राव, काँग्रेसचे गोवा प्रभारी

ते पुढे म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी देहली येथे एक बैठक घेतली आणि या बैठकीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सहभाग घेतला.

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथील वाळू तस्कराने कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्‍याला चिरडले !

मंगळवेढ्यातील गोणेवाडी येथे वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी गणेश सोनलकर यांच्या अंगावर गाडी घालून वाळू तस्करांनी त्यांना चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याचा शासनाचा निर्णय !

कोरोनाविषयीचे नियम पाळून ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेशी लढण्याचे नियोजन केले आहे