राज्यातील चित्रपट आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून चालू होणार !

ज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून चालू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीची नियमावली सिद्ध करण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १४ नवीन रुग्णवाहिका उपलब्ध ! – वैभव नाईक, आमदार, शिवसेना

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. यातील ११ रुग्णवाहिका जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना, तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ आणि पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १ रुग्णवाहिका देण्यात येणार आहे….

२७ सप्टेंबरपासून गोव्यात मुसळधार पाऊस पडणार !  – हवामान विभाग

बंगाल खाडीवर २४ सप्टेंबरपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि ही स्थिती आता आणखी खालावली आहे. त्यामुळे गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केले ठाणे पोलिसांच्या स्वाधीन !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करत आहेत.

ग्रामीण भागात इयत्ता ५ वीपासून, तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी, तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू होणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली.

गोव्यातील कलम १४४ मागे घेतले असून कोरोना महामारीशी संबंधित विशेष मार्गदर्शक तत्त्वे लागू आहेत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यात लागू झालेले कलम १४४ (जमावबंदी आदेश) २० सप्टेंबरपासून मागे घेण्यात आला आहे, तर कोरोना महामारीशी संबंधित विशेष मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

टोळीयुद्धे कधी थांबणार ?

‘गोळीबारासारख्या घटना न्यायालयांत वारंवार होतात; मात्र पोलीस त्यावर ठोस उपाययोजना काढत नाहीत’, असे अधिवक्त्यांचे म्हणणे आहे, जे की अत्यंत चिंताजनक आहे.

चीन आणि क्वाड !

‘क्वाड’मधील देशांनी एकत्र येऊन प्रथमत: आपापल्या देशांतील चीनच्या हस्तकांना वठणीवर आणायला हवे, तसेच संशोधन आणि सैन्य यांच्या स्तरावर संघटितपणे अन् उघडपणे चीनच्या विरोधात उभे रहायला हवे.

बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध जनहित याचिका प्रविष्ट करून ती मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने चौघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक

काही मास नियंत्रणात असलेला कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ७१ नवीन रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला आहे.