भिवंडी येथे बनावट नोटा बनवणारी टोळी अटकेत !

२८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

बनावट नोटा बनवणारी टोळी (सौजन्य : ABP माझा )

ठाणे, २५ सप्टेंबर (वार्ता.) – बनावट नोटा बनवून त्या चलनात आणण्याच्या सिद्धतेत असलेला अहमद नाजम नाशिककर (वय ३२ वर्षे) आणि चेतन एकनाथ मेस्त्री (वय ४१ वर्षे) या दोघांना भिवंडी येथील शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी ५०० आणि १०० रुपयांच्या २ लाख १९ सहस्र ५०० इतक्या किंमतीच्या बनावट नोटा अन् नोटा छापण्यासाठी उपयोगात आणला जाणारा कागद, प्रिंटर आदी यंत्रसामग्री जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.