पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एका हिंदु तरुणीची प्रशासकीय अधिकारीपदी निवड !

पाकमध्ये हिंदु तरुणी जरी प्रशासकीय अधिकारी बनली, तरी तिला मोकळ्या वातावरणात काम करायला मिळेल का ? ‘पाकमधील हिंदु महिलांचाही सन्मान केला जातो’, हे दाखवण्यासाठी पाकमध्ये अशा नियुक्त्या होतात, हे स्पष्ट आहे. – संपादक 

डॉ. सना रामचंद गुलवाणी

स्लामाबाद (पाकिस्तान) – २७ वर्षीय डॉ. सना रामचंद गुलवाणी या तरुणीची पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एका हिंदु तरुणीने सर्वांत कठीण समजली जाणारी सी.एस्.एस्. (सेंट्रल सुपरिअर सर्विस) ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ‘आई-वडिलांना मी ‘प्रशासकीय क्षेत्रात न जाता वैद्यकीय व्यवसायात जावे’, असे वाटत होते; परंतु मी दोन्हीही गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यामुळे आई-वडिलांचेही स्वप्न साकार झाले आहे’, असे डॉ. सना गुलवाणी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानामध्ये ‘सी.एस्.एस्.’ची परीक्षा सर्वाधिक कठीण मानली जाते. या माध्यमातूनच पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवांमध्ये नियुक्त्या होतात.