‘मुक्त पर्यटना’विषयी स्पष्टीकरण देण्यासाठी शासनाने न्यायालयाकडे वेळ मागितला
कोरोना महामारीवरून नियुक्त केलेल्या गोवा शासनाच्या तज्ञ समितीने कोरोना महामारीच्या काळात गोव्यात ‘मुक्त पर्यटना’ला अनुमती न देण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा शासनाने हा निर्णय प्रतिज्ञापत्राद्वारे गोवा खंडपिठाला कळवला आहे.