(म्हणे) ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करा !’

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सावंतवाडीचे तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन

कोणत्याही राजकारण्याने राष्ट्रध्वज फडकावण्यास विरोध करू नये ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वास्को येथील सेंट जेसिंतो बेटावर ध्वजारोहण करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलीप डिसोझा यांनी विरोध केल्याचे प्रकरण

मुख्यमंत्र्यांना ७५ सहस्र पत्रे पाठवून भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याची आठवण करून देऊ ! – आशिष शेलार, भाजप

भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने ७५ सहस्र ‘पोस्टकार्ड’ पाठवून भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली, याची मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी २५ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

कोरोना प्रतिबंधक साहित्य विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमीष दाखवून २२ लाख रुपयांची फसवणूक !

कोरोना प्रतिबंधक साहित्य विक्रीचा व्यवसाय आणि मुंबई महापालिकेत साहित्य पुरवण्याचे काम मिळवून देण्याचे आमीष दाखवून येथील व्यावसायिकाची ‘बॉम्बे ट्रेडर्स’ने फसवणूक केल्याची घटना घडली.

मालवण येथे ‘दैनिक सामना’च्या प्रती जाळल्याच्या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या मनाई आदेशाचा भंग करून ‘दैनिक सामना’ या वृत्तपत्राच्या प्रती जाळल्याच्या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून एकूण १० ते १२ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

जनतेला (दळणवळण बंदीत) सवलती देण्यासाठी आणखी काही दिवस थांबावे लागेल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाचा संदर्भ देत राजकीय विषयावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘अद्यापही हे संकट पुरते गेलेले नाही. नवे विषाणू येत आहेतच; पण काही जुने विषाणूही परत आले आहेत. हे जुने विषाणू वेगवेगळे ‘साइड इफेक्ट्स’ पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

शासकीय सेवेत असतांना अधिकार्‍यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

अनुकंपा तत्त्वावर आता गट ‘अ’ आणि ‘ब’ मधील अधिकार्‍यांचा शासकीय सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातीलही एका सदस्याला नोकरी देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

‘लोकजागृती सामाजिक प्रतिष्ठान’ आणि ‘उत्कर्ष महिला समिती’ यांच्या आंदोलनानंतर शाळा व्यवस्थापनाची चर्चेची सिद्धता !

सरकारचा आदेश डावलून ‘चेंबूर कर्नाटक हायस्कूल’ची विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्काची वसुली

शिरापूर (सोलापूर) येथील शेतकर्‍याने मागितली गांजा लागवडीची अनुमती !

भारतासारख्या कृषीप्रधान देशात हमीभाव न मिळाल्याने गांजाची शेती करण्याची अनुमती मागण्याची वेळ येते यापेक्षा दुर्दैव ते काय ?

तळमळीने सेवा आणि सतत गुरुस्मरण करणारे बीड येथील श्री. शेषेराव सुस्कर (वय ६१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. शेषेराव सुस्कर यांनी तीव्र तळमळीने आणि चिकाटीने सेवा केली आहे. त्यांची ‘सनातन प्रभात’च्या अनेक वाचकांशी चांगली जवळीक आहे. गेल्या १० वर्षांपासून त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा नियमितपणे मनापासून केली आहे.