ठाणे येथे शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने जीवघेणे आक्रमण

एक धर्मांध आणि अन्य २ जण कह्यात

अमित जयस्वाल

ठाणे, २६ ऑगस्ट (वार्ता.) – येथील वृंदावन सोसायटी भागातील शिवसेनेचे विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून अनिस सय्यद याने चाकूने जीवघेणे आक्रमण केल्याची घटना २५ ऑगस्टच्या रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास घडली आहे.

या आक्रमणात अमित हे गंभीररीत्या घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे आक्रमण करणार्‍या अनिस याच्यावरही जमावाने आक्रमण केल्याने तोही घायाळ झाला आहे. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे नोंद केले असून अमित जयस्वाल यांच्यावर जीवघेणे आक्रमण केल्याच्या प्रकरणी अनिस सय्यद आणि अन्य दोघे यांना ठाणे पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे. येथील बाजारपेठेतील एका गाळ्याच्या समोरील जागेवरून अमित जयस्वाल आणि उस्मान सय्यद यांच्यात ३-४ मासांपूर्वी वाद झाला होता. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झालेला आहे. २५ ऑगस्टच्या रात्री श्रीरंग सोसायटी येथील शिवसेनेच्या शाखेजवळ हा वाद पुन्हा उफाळून आला.