छपरा (बिहार) येथे २ वर्षांपूर्वी चोरी झालेल्या कोट्यवधी मूल्याच्या २ मूर्ती अज्ञातांनी केल्या परत !

छपरा (बिहार) – येथील फतेहपूर सरैया गावामध्ये २० मासांपूर्वी राम जनकी मठामधून अष्टधातूच्या श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या प्राचीन मूर्तींची चोरी झाली होती. आता या ३ पैकी श्रीराम आणि सीतामाता यांच्या मूर्ती मंदिराच्या परिसरात अज्ञातांकडून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. वर्ष २०१२ मध्ये चोरट्यांनी तत्कालीन पुजार्‍याला बांधून मंदिरातील ३ मूर्ती चोरून नेल्या होत्या. काही मासांनी बिहार आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी या मूर्ती खंडित अवस्थेत मिळवल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये पुन्हा या मंदिरातून ३ मूर्ती चोरी झाल्या होत्या. त्यातील २ आता परत करण्यात आल्या आहेत. या मूर्तींचे मूल्य कोट्यवधी रुपयांमध्ये आहे, असे सांगण्यात येत आहे.