देवस्थान समित्या महामारीच्या काळात गरजूंना साहाय्य करतात, तशा अन्य धर्मियांच्या संस्था करतात का ? काही ख्रिस्ती गरीब आणि आदिवासी यांना साहाय्य करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर मात्र करतात, हे लक्षात घ्या !
म्हापसा, १० जून (वार्ता.) – कोरोना महामारीमुळे सध्या सामान्य जनतेचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. अशा कठीण प्रसंगी सामाजिक दायित्व ओळखून क्षेत्र विठ्ठलवाडी, म्हापसा येथील श्रीविठ्ठल-रखुमाई देवस्थान समितीने म्हापसा नगरपालिकेच्या प्रभाग क्र. १० मधील १०० गरजू कुटुंबांना कडधान्य आणि भाजी यांचे घरपोच वितरण करून समाजाप्रती आदरभाव राखला. श्रीविठ्ठल-रखुमाई देवस्थान समितीने विठ्ठलवाडी यूथ असोसिएशनच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला. कडधान्य आणि भाजी यांच्या वितरणाला श्रीविठ्ठल-रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्री. तुषार टोपले, युवा उद्योजक श्री. अमय नाटेकर, श्री. उर्वेश नाटेकर आणि अॅड्. शिवदत्त मंजू यांचे सहकार्य लाभले. श्रीविठ्ठल-रखुमाई देवस्थानचे सचिव श्री. परेश नाटेकर, खजिनदार श्री. दिनेश मिशाळ, मुखत्यार श्री. सूरज डांगी, श्री. संकेत म्हापसेकर, श्री. केवल शिरोडकर, श्री. श्रेयश कवळेकर, श्री. रितेश मणेरकर, तसेच विठ्ठलवाडी युथ असोसिएशनचे अध्यक्ष श्री. ओमकार फळारी, सचिव श्री. नीलेश घाटवळ, खजिनदार श्री. सदानंद दिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वितरण करण्यात आले. कडधान्य आणि भाजी वितरण करतांना या संस्थांनी गाजावाजा न करता प्रत्येकाच्या घरात साहित्य पोचवले.