महसूल अधिकार्‍यांच्या शासकीय कामात अडथळा आणणार्‍या वाळू तस्कराला अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे, ११ जून – अवैध गौण खनिज उत्खनन आणि चोरी यांवर महसूल विभागाच्या पथकाची कारेगावात (ता. शिरूर) येथे कारवाई चालू होती. एका ट्रकचालकाकडे पावती नसल्याने तो ट्रक रांजणगाव पोलीस ठाण्याच्या दिशेने घेऊन जात असतांना आरोपी धीरज पाचर्णे याने ट्रकचालकास थांबवून ट्रकमधील वाळू रस्त्याच्या कडेला ओतून दिली आणि दमदाटीने ट्रकचालकास घेऊन निघून गेला. तेव्हा शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पाचर्णेवर गुन्हा नोंद केला होता. ही घटना ३० ऑक्टोंबर २०२० या दिवशी घडली होती. या घटनेपासून गेली ७ मास पसार असलेला आरोपी धीरज पाचर्णे हा शिरूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे.