‘ओबीसी’ आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ! – पंकजा मुंडे, सरचिटणीस, भाजप

भाजपच्या सरचिटणीस श्रीमती पंकजा मुंडे

संभाजीनगर – ‘राज्य सरकारला ‘ओबीसी’ समाजाला आरक्षण मिळावे, असे वाटत नाही, त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नीट बाजू मांडली नाही. ‘ओबीसी’ आरक्षणाविषयी राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे’, असा आरोप भाजपच्या सरचिटणीस श्रीमती पंकजा मुंडे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या अनुषंगाने सरकारने काढलेला अध्यादेश कालबाह्य  होऊ दिल्याने यापुढे राज्यात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतर मागासवर्गास न मिळणारे आरक्षण अन्याय करणारे असून या विषयावर शांत रहाणार नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी या प्रश्‍नी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या वेळी खासदार डॉ. भागवत कराड, डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होते.