गोव्यात कोरोनामुळे दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू, तर ४२३ नवीन कोरोनाबाधित

पणजी – गोव्यात ११ जून या दिवशी कोरोनाबाधित १३ रुग्णांचा मृत्यू झाला. दुसर्‍या लाटेत पहिल्यांदाच ही संख्या एकेरीत आली आहे. एकूण मृतांची सख्या २ सहस्र ८९९ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र ५९९ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ४२३ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ११.७५ टक्के आहे. दिवसभरात ८१९ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ७६ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून ५ सहस्र २०१ झाली आहे.