खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला ‘हुतात्मा’ म्हणणारे क्रिकेटपटू हरभजनसिंह यांची क्षमायाचना

भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी खलिस्तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले याच्या मृत्यूदिनानिमित्त त्याला श्रद्धांजली देणारी पोस्ट केल्यावरून क्षमायाचना केली आहे.

१० सहस्र पाणीस्रोतांची होणार तपासणी ! – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर

पिण्याच्या पाण्याची गुणवता चांगली रहावी आणि मान्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊ नये, तसेच दूषित पाण्यामुळे गावात कोणतेही साथीचे रोग उद्भवू नयेत यासाठी पाणी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हापूड(उत्तरप्रदेश) येथे बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या पीडितेला गर्भपात करण्याचा पंचायतीचा आदेश

अशा पंचायतीला विसर्जित करून संबंधितांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !

हिंदु वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती मुलाकडून मृतदेह पुरण्याची मागणी नातीने फेटाळत केले अंत्यसंस्कार !

हिंदु संस्कारानुसार कृती करणार्‍या अशा तरुणींकडून हिंदूंनी आदर्श घ्यावा !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे गोवर्धन गोशाळेचे भूमीपूजन पार पडले !

या वेळी महंत व्यंकटअरण्य महाराज, महंत मावजीनाथ महाराज, महंत ईच्छागिरी महाराज, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक सुनील रोचकरी, संजय सोनवणे तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एस्.टी. आगारात वाढदिवस साजरा केला म्हणून आगारप्रमुखासह ११ जणांवर गुन्हा नोंद

कोरोना महामारी गंभीर स्वरूप धारण करत असतांना नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा करणे गंभीर आहे.

भोपाळ शहरातील मोगलकालीन ‘लालघाटी’ आणि ‘हलालपुरा’ नावे पालटा !

मुळात अशी नावे पालटण्याची मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून मोगलांनी दिलेली नावे पालटली पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

खंडाळा (सातारा) परिसरात हवेत गोळीबार केल्याप्रकरणी ९ जणांना अटक

खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात मद्यप्राशन करून एकाने बंदुकीतून हवेत गोळीबार केला.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे भूमीपूजन

आमदार आणि प्राधिकरण सदस्य राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले.

सातारा जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्याने लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी

गर्दी वाढल्यास कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार. त्यामुळे प्रशासनाने गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !