मुंबई उच्च न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित !

उच्च न्यायालयाने राणा यांना ठोठावला २ लाख रुपयांचा दंड !
राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता !

पंतप्रधान सर्व प्रश्‍न सकारात्मकतेने सोडवतील, अशी अपेक्षा आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील विविध विषय मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती !

म. गांधी यांच्या पणतीला फसवणुकीच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

स्वत: ला व्यावसायिक म्हणून घेत लता यांनी स्थानिक व्यावसायिकाकडून ६० लाख रुपये हडपले. प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची ती मुलगी आहे.

देशामध्ये मोठे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचला जात आहे ! – एन्.आय.ए.

अशी माहिती देणारा दूरभाष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ने) आल्याने या प्रकरणी अन्वेषण चालू करण्यात आले आहे. हा दूरभाष बंगालमधील रानाघाट येथून आल्याची माहिती समोर आली आहे.

भारतासमवेत ट्विटर पूर्णपणे कटीबद्ध आहे आणि राहील !  

चेतावणी दिल्यानंतर ट्विटर नरमते, हे लक्षात घ्या ! सरकारने अशांवर अधिक कठोर नियम लागू केले पाहिजेत !

फ्रान्सने गूगलला ठोठावला १ सहस्र ९५३ कोटी रुपयांचा दंड !

ऑनलाईन विज्ञापनांच्या बाजारपेठेत नियम डावलून एकतर्फी वर्चस्व निर्माण केल्याच्या प्रकरणी फ्रान्स सरकारने गूगल आस्थापनाला १ सहस्र ९५३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फ्रान्सच्या ‘मार्केट कॉम्पिटीशन रेग्युलेटर’ने गूगलवर ही कारवाई केली.

कॅनडामध्ये तरुणाने मुसलमान कुटुंबाला ट्रक खाली चिरडल्याने चौघांचा मृत्यू

कोणत्याही धर्माचा द्वेष करणे चुकीचेच आहे; मात्र जेव्हा धर्मांधांकडून अन्य धर्मियांचा द्वेष केला जातो, त्यांना ठार मारले जाते, तेव्हा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

देशात लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ४७५ जणांचा मृत्यू ! – केंद्र सरकार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार देशात २८ मेपर्यंत कोरोनावरील लस घेतल्यानंतरही ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

लडाख सीमेजवळ चीनच्या लढाऊ विमानांचा सराव !

चीनच्या वायूदलाकडून लडाख सीमेजवळील त्याच्या तळावर सराव करण्यात येत आहे. २० ते २२ लढाऊ विमाने या सरावात सहभागी झाल्याचे दिसून आली. यात जे-११ आणि जे-१६ या विमानांचा समावेश आहे.