विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली !

मराठा आरक्षण प्रश्‍नी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे.

नाशिक येथे खासगी रुग्णालयाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन !

येथील सिन्नर भागातील एका खासगी रुग्णालयाने कोरोनाबाधितावर उपचार करतांना अव्वाच्या सव्वा दराने रक्कम आकारली. तसेच रुग्णाची अनामत रक्कम देण्यास रुग्णालय प्रशासन टाळाटाळ करत होते.

नागपूर येथे मराठी भाषेला डावलण्यावरून विधी सदस्य आक्रमक !

विद्यापिठाने त्वरित चूक दुरुस्त करण्याची मागणी

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने व्यापक प्रमाणात करण्यात आला ‘ऑनलाईन’ अध्यात्मप्रसार !

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने धर्माचरण कसे करावे ? आणि या सणाचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली अन् सातारा या जिल्ह्यांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ पद्धतीने सामाजिक माध्यमे यांद्वारे अध्यात्मप्रसार करण्यात आला.

दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचा भाजपचे खासदार नारायण राणे यांच्याकडून निषेध !

ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद लिखाण केले आहे, असा आरोप ट्वीटद्वारे करत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी त्यांचा जाहीर निषेध केला आहे.

तौक्ते चक्रीवादळातील हानीग्रस्तांना २५० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित करण्याचा राज्यशासनाचा निर्णय ! – विजय वडेट्टीवार, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री

मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठी हानी झाली आहे. यातील हानीग्रस्तांना राज्यशासनाने २५० कोटी रुपये इतके अर्थसाहाय्य घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे,

नागपूर येथे बालकांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सुसज्ज ठेवावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’द्वारे साहाय्य करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. या वेळी त्यांनी काळ्या बुरशीच्या (म्युकरमायकोसिसच्या) स्थितीचा आढावाही घेतला.

५० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या आरे दुग्ध वसाहतीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या घरातून ३ कोटी ४६ लाख १० सहस्र रुपयांची रोकड हस्तगत !

कोट्यवधी रुपये हडप करणार्‍या लाचखोरांची सर्व संपत्ती हस्तगत करावी ! लाचखोरांना कठोरात कठोर शासन झाल्यासच कुणी लाच मागण्याचे धाडस करणार नाही !

नोकरीत आरक्षण दिल्यावर पदोन्नतीत आरक्षण देऊ नये ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख

पत्रात अजय सिंह सेंगर यांनी लिहिले आहे की, जातीवर आधारित विषमतानामक कीड नष्ट करणे, ही काळाची आवश्यकता आहे. प्रत्येक जातीसाठी वेगवेगळा न्याय आणि कायदा प्रणाली भविष्यात यादवी (गृहयुद्ध) निर्माण करू शकते.

कोरोनासह ‘म्युकरमायकोसिस’च्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही प्रमाणात ‘म्युकरमायकोसिस’च्या औषधांची निर्मिती होणार आहे, तसेच जागतिक निविदेच्या माध्यमातून ही औषधे उपलब्ध होतील. या रोगावरील उपचारासाठीचा निधी कमी पडू देणार नाही, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.