बुलढाणा येथे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे चारचाकी वाहन जाळण्याचा प्रयत्न २ अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला. २६ मे या दिवशी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्षी ३३ लाख ५० सहस्र रुपयांचा आर्थिक बोजा

राज्य आर्थिक संकटात असतांना वैयक्तिक गोष्टींवर सर्वसामान्यांच्या करातून आलेल्या पैशांची उधळपट्टी करणे अपेक्षित नाही. सरकारी तिजोरीत अशा प्रकारे कुठेकुठे अनावश्यक व्यय होत आहे का ? याचा अभ्यास करून सरकारने हा व्यय थांबवावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे !

बेलारूस आणि भारत !

रोमन या २६ वर्षीय पत्रकाराने गतवर्षी झालेल्या बेलारूस येथील राष्ट्रीय निवडणुकीच्या कालावधीत तेथील हुकूमशाहच्या विरोधात जनचळवळ उभारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गतवर्षीच्या शेवटी बेलारूस सरकारकडून त्याला ‘आतंकवादी’ म्हणून घोषितही करण्यात आले होते.

हुंड्यासाठी छळ करणार्‍या बाहेरख्याली पोलीस पतीला पत्नीने जाळ्यात अडकवून रंगेहाथ पकडले !

गुप्तचर शाखेचा अधिकारी सत्यम बहल याला त्याच्या पत्नीने सापळा रचून अन्य महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यावरून रंगेहाथ पकडले. यामुळे पत्नीने पोलीस उपमहानिरीक्षकांकडे पतीवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

हिंगोली येथे कोविड प्रभागात थांबून कोरोनाचा प्रसार करणार्‍या रुग्णांच्या ४० नातेवाइकांवर गुन्हे नोंद !

कोरोनाचे संकट तीव्र असल्याने कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येते. तरीही त्यांचे उल्लंघन करणे, हे गंभीर आहे !

शौर्याचे जागरण करणे ही काळाची आवश्यकता ! – अभिजीत कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

शौर्यजागृती व्याख्यानाच्या माध्यमातून स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचा चिंचवड येथील धर्मप्रेमींचा निर्धार !

नागपूर येथील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मोहोकर निलंबित !

महापालिकेकडून प्रति मास १ लाख ५० सहस्र रुपयांचे वेतन घेत असतांनाही डॉ. मोहोकर या स्वत:चे खासगी रुग्णालय चालवत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या.

स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हा ! –  कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती

कोणत्याही स्थितीत स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपण स्वतःच सिद्ध व्हायला हवे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी केले.

‘लाचखोरी वृत्ती’चा अंत कधी ?

भरती प्रक्रियेच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फोडून काहीजण ती व्हॉट्सअ‍ॅपवरून वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रप्रमुखांना मोठ्या रकमेला विकत होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सैन्यदलातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह ९ जणांना अटक करण्यात आली.

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये हिंदूंवरील अन्याय जाणा !

जयपूरच्या सांगानेर भागात पोलीस आणि प्रशासन यांनी मंदिरांवरील भोंगे वाजवण्यावर बंदी घातली आहे. याचा भाजपचे स्थानिक आमदार आणि जयपूर शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून जाब विचारला आहे.