मास्क परिधान करण्यास सांगितल्यावर रशियाच्या महिला पर्यटकाने कांदोळी येथील सूपरमार्केटचा बिलिंग काऊंटर तोडला

सूपरमार्केटमध्ये प्रवेश करतांना मास्क घालण्यास सांगितल्यावर रशियाच्या महिलेने रागाने संगणक खाली टाकले.

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ४८७ नवीन रुग्ण

गोव्यात सध्या मडगाव येथे सर्वाधिक १ सहस्र ५०२ रुग्ण आहेत.

अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारे सुरक्षा साहाय्य बंदच रहाणार !

अमेरिकेने मागील ट्रम्प सरकारचे धोरण कायम ठेवत पाकिस्तानला सुरक्षा साहाय्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये ट्रम्प सरकारने हे साहाय्य बंद केले होते.

श्रीलंकेतील ‘कोलंबो पोर्ट सिटी’ बनवण्याचे कंत्राट चीनकडे !

चीनमधील एका आस्थापनाला शहरात नवीन बंदर शहर (पोर्ट सिटी) बनवण्याचे कंत्राट मिळाले आहे. संसदेत याविषयीचे विधेयक संमत करण्यात आले. विरोधी पक्षाने याला विरोध केला होता; मात्र बहुमताच्या जोरावर सरकारने हे विधेक संमत केले.

बेलारूसमधील हुकूमशाहीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकाराला अटक !

पूर्व युरोपीय देश बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये नुकत्याच एका २६ वर्षीय पत्रकाराला अटक करण्यात आली. रोमन प्रोतासेविच असे त्यांचे नाव असून गेल्या ऑगस्टमध्ये बेलारूसमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत त्याने राष्ट्राध्यक्ष अलेक्सझँडर लुकाशेन्को यांच्या विरोधात जनचळवळ उभारली……

‘यास’ चक्रीवादळ ओडिशा आणि बंगाल यांना झोडपून झारखंडच्या दिशेने मार्गस्थ !

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आलेले ‘यास’ नावाचे चक्रीवादळ आता झारखंडच्या दिशेने जात आहे. यापुढच्या प्रवासात वादळाचा वेग आणि तीव्रता हळूहळू कमी होत जाणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या विरोधातील स्पष्ट पुरावा नष्ट केला ! – सत्र न्यायालयाचा पोलीस तपासावर ठपका

न्यायालयाने ‘तेहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचार प्रकरणी नुकतीच निर्दोष सुटका केली आहे. यासंबंधी ५२७ पानी निवाड्यात न्यायालयाने  गोवा पोलिसांच्या विरोधात शेरा मारला आहे.

केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीच्या विरोधात व्हॉट्सअ‍ॅपची देहली उच्च न्यायालयात याचिका

‘केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांमुळे नागरिकांच्या खासगी गोष्टी खासगीत रहाणार नाहीत’, असा दावा व्हॉट्सअ‍ॅपने यात केला आहे. या नियमानुसार सामाजिक माध्यमे असणार्‍या आस्थापनांना त्यांच्या मंचावरून पाठवलेल्या संदेशांचा स्रोत स्वतःकडे नोंदून ठेवावा लागणार आहे.