विनापरवाना कोरोना चाचणी करणार्‍या लॅबवर कारवाई

(प्रतिनिधिक छायाचित्र)

सासवड (पुणे) – शहरात विनापरवाना ‘कोविड रॅपिड अँटीजेन’ चाचणी करणार्‍या पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करून तिला टाळे ठोकण्यात आले. पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रूपाली सरनौबत, पोलीस अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी इत्यादींच्या पथकाने ‘लॅब’ला भेट देऊन तेथील तपशील पहात ही कारवाई केली. सासवड शहरातील साळीआळी भागात ही ‘पॅथॉलॉजी लॅब’ आहे. येथे ‘रॅपिड अँटीजेन’ चाचणी केली जात होती; मात्र त्यासाठी आवश्यक असणारी शासनाकडील आरोग्यसेवेच्या जिल्हा शल्य चिकित्सकांची अनुमती नसल्याचे आढळले. यासंदर्भात विचारले असता उडवाउडवीची आणि अधांतरी उत्तरे देण्यात आली.