संभाजीनगर येथे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाकडून २६ दुकाने आणि आस्थापन यांच्यावर कारवाई !

१ लाख २५ सहस्र रुपयांचा दंड वसूल !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संभाजीनगर – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील २६ दुकाने आणि आस्थापने यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत त्यांनी या दोघांकडून १ लाख २५ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कामगार उपायुक्त, महानगरपालिका आणि महसूल अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत ‘विशेष भरारी पथके’ सिद्ध केली, तसेच दुकाने आणि अत्यावश्यक सेवेतील आस्थापन वगळून इतर आस्थापन चालू रहाणार नाहीत, याची दक्षता घेऊन त्यावर कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना दिल्या. या बैठकीनंतर सुनील चव्हाण, डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील शहागंज, किराडपुरा, जालना रस्ता अशा अनेक ठिकाणी पहाणी केली, तसेच नियमांची कार्यवाही न करणारी दुकाने आणि आस्थापन यांच्यावर कारवाई केली.