
ठाणे, २३ मे (वार्ता.) – विरार पूर्व भागातील बालाजी रुग्णालयातील आधुनिक वैद्यांवर रुग्णाच्या नातेवाइकांनी आक्रमण केल्याची घटना घडली आहे. आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करतांना महिला रुग्णाच्या नाकात नळी तुटल्याने नाकातून रक्तस्त्राव झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.
रुग्णाच्या नातेवाइकांनी आधुनिक वैद्यांना शिवीगाळ करून आक्रमण केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आधुनिक वैद्य श्रीराम अय्यर यांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण विरार पोलीस करत आहेत.
मूल्यांकन करून राज्यातील शासकीय रुग्णालयांचे होणार नामांकन !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण