श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि जय हिंद फूड बँक यांच्या सहकार्याने गरजू लोकांसाठी अन्नदान सेवा !

अक्कलकोट शहर आणि परिसरातील निराधार अन् गरजू लोकांना एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘ऑनलाईन’ शिक्षणाने लिखाणाचाच विसर !

लिखाणाचा सराव केल्याने मराठी व्याकरणाचाही सराव होतो. एकदा लिहिणे म्हणजे दोन वेळा वाचन केल्यासारखे आहे. त्यामुळे प्रश्‍नोत्तरे लिहिल्यास ते लवकर लक्षात रहाण्यास साहाय्य होते.

भारतियांची चीनविरुद्धची मवाळ नीती पालटायला हवी ! – अभिजित अय्यर-मित्रा, संरक्षण आणि विदेशनीती विशेषतज्ञ

व्हिएतनामसारखे राष्ट्र चीनला अनेक वेळा नमवते. आपण भाषण देण्यामध्ये चांगले असण्यापेक्षा रणनीती चांगली करण्यामध्ये प्रयत्न करायला हवेत.

इस्लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

भारतीय सैन्य जगातील कोणत्याही सैन्याच्या तोडीस तोड आहे. पाकिस्तानमध्ये कोणत्याही अडचणी आल्यास ते भारताला त्रास देतात. ही त्यांची नित्याची रणनीती आहे.

२२ एप्रिलच्या रात्रीपासून राज्यांतर्गत केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवासाची अनुमती !

लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो रेल्वेने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करू शकणार आहेत.

नागपूर येथे रेमडेसिविर इंजेक्शन विकतांना वॉर्डबॉयसह तिघांना अटक !

कोरोनाचे संकट असतांना रुग्ण, नातेवाईक यांना साहाय्य न करता अधिक दराने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करून त्यांची लुबाडणूक करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांकडून ते पैसे वसूल करून घ्यावेत, तसेच त्यांना अधिक वेळ काम करण्याची शिक्षा द्यावी !

नागपूर येथे बांगलादेशी ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनची २० ते २५ सहस्र रुपयांना विक्री !

बांगलादेशी ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनची विक्री होत असतांना प्रशासनाला थांगपत्ताही कसा लागत नाही ? उद्या पाकिस्तान आणि चीन येथून इंजेक्शन आल्यास त्यावर कोण नियंत्रण ठेवणार ?

पुणे येथील इंद्राणी तावरे हिला गीता परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ गीताअध्याय शुद्धपठण परीक्षेत प्रमाणपत्र !

एवढ्या लहान वयात इंद्राणीची गीता शिकण्याची इच्छा, आवड आणि उच्चारातील स्पष्टता पाहून परीक्षक प्रभावित झाले

रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर औषधे, तसेच कोरोनासाठीच्या अत्यावश्यक साहित्याची खरेदी अन् वितरण यांचे दायित्व राज्यांवर सोपवावे !

रेमडेसिविर आणि इतर औषधे, तसेच कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी अन् त्यांचे वितरण यांचे दायित्व राज्यांकडे द्यावे. साथरोगाविषयीचे व्यवस्थापन फार काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे.

संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयातील ३ परिचारिकांवर ५० रुग्णांच्या सेवेचा भार !

गेल्या वर्षभरातील कोरोनाच्या संसर्गामुळे येथील घाटी रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्या तुलनेत परिचारिकांची संख्या अल्प असल्यामुळे सध्या कार्यरत परिचारिकांवर कामाचा ताण वाढला आहे.