
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यशासनाने दळणवळण बंदी लागू केली आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना न्यासाकडून अन्नदान सेवा चालू करण्यात आली आहे. येथील ‘जय हिंद फूड बँक’ यांच्या सहकार्याने अक्कलकोट शहर आणि परिसरातील निराधार अन् गरजू लोकांना एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचा प्रारंभ १८ एप्रिल या दिवशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्याम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण घाटगे, जय हिंद फूड बँकेचे अंकुश चौगुले, तसेच शहाजी यादव, अशोक जाधव, योगेश पवार, अतिश पवार, महांतेश स्वामी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !
आनंदी जीवनासाठी ‘जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ हीच त्रिसूत्री ! – वैद्य सुविनय दामले