|
संभाजीनगर – गेल्या वर्षभरातील कोरोनाच्या संसर्गामुळे येथील घाटी रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्या तुलनेत परिचारिकांची संख्या अल्प असल्यामुळे सध्या कार्यरत परिचारिकांवर कामाचा ताण वाढला आहे. केवळ ३ परिचारिका ५० रुग्णांची सेवा करत आहेत. तर ‘आयसीयू’मध्ये ५ खाटांमागे एका परिचारिकेला काम करावे लागते. ‘इंडियन नर्सिंग कौन्सिल’च्या धोरणानुसार ३ खाटांमागे १ परिचारिका असणे आवश्यक आहे.
घाटी रुग्णालयात ७५० बेड आहेत. सध्या ५० खाटांसाठी एका पाळीत ३-४ परिचारिका काम करतात. आपत्ती मोठी आणि परिचारिकांची संख्या अल्प असल्यामुळे त्यांच्या सर्व अर्जित रजा रहित केल्या आहेत. त्यामुळे परिचारिकांची संख्या वाढवणे आणि पदभरती तातडीने करावी, असे मत अधिसेविका विमल केदारे यांनी व्यक्त केले आहे.
‘ऐन उन्हाळ्यात ‘पीपीई किट’चा वापर आणि अतिरिक्त कामे यांमुळे शारीरिक अन् मानसिक स्तरावर सर्वच परिचारिकांची ओढाताण होते’, असे मत येथील परिचारिकांनी व्यक्त केले.