बांगलादेशी ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनची विक्री होत असतांना प्रशासनाला थांगपत्ताही कसा लागत नाही ? उद्या पाकिस्तान आणि चीन येथून इंजेक्शन आल्यास त्यावर कोण नियंत्रण ठेवणार ?
नागपूर, २२ एप्रिल (वार्ता.) – येथे बांगलादेशी ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनची विक्री आणि वापरही उघडपणे चालू आहे; मात्र अन्न आणि औषध प्रशासनाला त्याची माहितीच नाही. प्रत्यक्षात ते इंजेक्शन प्रमाणित आहे कि नाही, याविषयीही शंका आहे; मात्र अनेक औषधी विक्रेत्यांकडून ते चोरीच्या मार्गाने पोचवले जात आहे. त्यांची २० ते २५ सहस्र रुपयांना विक्रीही केली जात आहे.