पुणे येथील इंद्राणी तावरे हिला गीता परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ गीताअध्याय शुद्धपठण परीक्षेत प्रमाणपत्र !

कु. इंद्राणी सुधीर तावरे (वय ६ वर्षे)

पुणे – गीता परिवाराच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ श्रीमद्भगवद्गीता संथा वर्ग’ घेण्यात येतो. या वर्गात गीतेच्या बाराव्या आणि पंधराव्या अध्यायाचे ‘ऑनलाईन प्रशिक्षणवर्ग’ मार्चमध्ये आयोजित करण्यात आले होते. या वर्गाच्या परीक्षेसाठी अध्यायाचे शुद्ध आणि स्पष्ट उच्चारात वाचन करून त्याचा ‘व्हिडिओ’ ऑनलाईन देकण्यास सांगितला होता. यात सहभागी झालेल्या पुणे येथील कु. इंद्राणी सुधीर तावरे (वय ६ वर्षे) हिला गीता परिवाराच्या वतीने लहान वयात उच्चारातील स्पष्टता आणि अचूकपणा यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले.

गीता परिवाराच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ परिक्षेत कु. इंद्राणी तावरे (वय ६ वर्षे) हिला मिळालेले प्रमाणपत्र !

या स्पर्धेमध्ये लहान विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये इंद्राणी सर्वांत लहान वयातील विद्यार्थिनी होती. इंद्राणी लहान असल्याने तिला अजून संस्कृत वाचता येत नाही. हे श्‍लोक तिने पालकांच्या साहाय्याने पाठ केले. एवढ्या लहान वयात इंद्राणीची गीता शिकण्याची इच्छा, आवड आणि उच्चारातील स्पष्टता पाहून परीक्षक प्रभावित झाले आणि त्यांनी तिला हे प्रमाणपत्र दिले.