पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेसाठी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांचे आंदोलन

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात यावी, यासाठी १० मार्च या दिवशी विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्‍यांवर विरोधकांनी आंदोलन केले. भाजप आणि मित्र पक्षांच्या आमदारांनी फलक दाखवून शासनाचा निषेध केला. घोषणा देऊन सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली.