आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करणार्‍या श्रमजीवी संघटनेच्या ७० कार्यकर्त्यांना अटक

 नेहमी लाभाचा विचार करणारे कर्तव्याचा विचार किती करतात ?

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर ९ मार्च या दिवशी सकाळी आंदोलन करणार्‍या श्रमजीवी संघटनेच्या ७० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर खावटी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हे कार्यकर्ते आंदोलन करत होते. खावटी योजनेचा लाभ देण्याचे आश्‍वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी आदिवासी श्रमजीवी संघटनेद्वारे ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक येथे आदिवासी मंत्र्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.