अशा कामचुकार आणि हलगर्जीपणा करणार्या प्रयोगशाळांवर कठोर कारवाई करायला हवी !
पुणे – कोरोनाबाधित असणार्या रुग्णांची अपुरी माहिती पाठवणार्या ३ खासगी प्रयोगशाळांना पुणे महापालिकेने टाळे ठोकले आहेत. यामध्ये क्रस्ना लॅब, मेट्रोपोलीस लॅब आणि सब अर्बन डायग्नोस्टिक सेंटर या प्रयोगशाळांचा समावेश आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोरोनाची चाचणी करू नका, अशी सूचना या प्रयोगशाळांना दिली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आदी माहिती तपशीलवार न नोंदवल्याने संबंधित व्यक्तीला संपकर्र् करण्यास, तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यात अनेक अडथळे येत असल्याने ही कारवाई केली.