आमदार राजेंद्र राऊत यांना जिवे मारण्याची धमकी; गुन्हा नोंद

बार्शी (जिल्हा सोलापूर) – येथील अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून ‘फेसबूक’च्या माध्यमातून बाबा पाटील या व्यक्तीने ठार मारण्याची धमकी दिली आहे.

महापालिकेचे बनावट नियुक्तीपत्र सिद्ध करणार्‍या १२ जणांवर गुन्हा नोंद !

प्रशासनात नियुक्तीचा कार्यक्रम घेण्याएवढे खोट्या निरोपाचे पत्र पाठवण्याचे धैर्य कसे होते ?

महाराष्ट्रातील स्थूल उत्पन्नात १ लाख ५६ सहस्र ९२५ कोटी रुपयांची घट !

५ मार्च या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पटलासमोर महाराष्ट्राचा आर्थिक पहाणी अहवाल मांडण्यात आला.

गोरेगाव (रायगड) येथे मांसासाठी गोवंशियांची अवैध हत्या करणार्‍या धर्मांधांना अटक

गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही त्याला भीक न घालता नियमांना पायदळी तुडवणार्‍या धर्मांधांना कठोर शासन केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंनी साधना करावी ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

‘मेकॉले’ शिक्षणपद्धतीमुळे आपण शिक्षित होत आहोत; पण धर्मापासून दूर जात आहोत. धर्माचरण करणे न्यूनतेचे वाटत आहे; पण संस्कृती सोडल्याचा परिणाम आज प्रत्येक घरात दिसत आहे.

४ वेळा नर्मदा परिक्रमा केलेले लेखक जगन्नाथ कुंटे यांचे निधन !

लेखक जगन्नाथ केशव कुंटे उपाख्य स्वामी अवधूतानंद यांचे ४ मार्च या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : महाशिवरात्र

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० मार्चला दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

देहली आणि केरळ येथील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवा ! – हिंदुत्वनिष्ठांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

हत्यांमागील सूत्रधार, त्यांना साहाय्य करणारे धर्मांध आणि ही प्रकरणे दाबणारे पोलीस अन् राजकारणी यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली.

परळी (बीड) येथील वैद्यनाथ महाशिवरात्री महोत्सव रहित !

कोरोनाच्या संसर्गामुळे येथील बारा ज्योतिर्लिंगांतील एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री महोत्सव रहित करण्यात आला असून ८ ते १६ मार्च या कालावधीत वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातील सर्व शिवालये भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत.

देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी नंदुरबार येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

देहली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून सखोल अन्वेषण केले जावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने भारताचे केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.