बार्शी (जिल्हा सोलापूर) – येथील अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून ‘फेसबूक’च्या माध्यमातून ‘लाईव्ह’ करून पनवेल (मुंबई) येथील नंदू तथा बाबा पाटील या व्यक्तीने ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे नंदू पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रशांत खराडे यांनी याविषयी तक्रार प्रविष्ट केली आहे.