प्रशासनात नियुक्तीचा कार्यक्रम घेण्याएवढे खोट्या निरोपाचे पत्र पाठवण्याचे धैर्य कसे होते ?

संभाजीनगर – महापालिका प्रशासन आणि राज्य अग्नीशमन कार्यालय यांच्या नावे बनावट नियुक्तीपत्र सिद्ध केल्याप्रकरणी १२ जणांवर सिटी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांच्या भ्रमणभाषवर आलेल्या नियुक्तीपत्राद्वारे हा प्रकार उघडकीस आला. ‘नियुक्तीपत्र दिलेल्या १२ जणांचा शपथविधी १५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता होईल. त्यास राज्यातील अनेक मंत्री उपस्थित रहातील’, असे पत्रात म्हटले होते. या बनावट स्वाक्षरीही करण्यात आली. त्यावरील आवक-जावक क्रमांक खोटा असून पत्राची माहिती आयुक्तांना व्हॉट्सअॅपवर मिळाली. यानंतर त्यांनी तक्रार प्रविष्ट करण्याचे आदेश दिले.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ