श्री शिवशंभू जागर समिती आणि समस्त पिंपरी ग्रामस्थ यांच्या वतीने ‘देहली विजयदिन सोहळा’ साजरा !

या वेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि सेनापती महादजी शिंदे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक श्री. ब.हि. चिंचवडे यांचे ‘मराठ्यांचा देहली दिग्विजय’ या विषयावर मार्गदर्शन झाले.

गोरक्षकांच्या सतर्कतेने ११ गोवंशियांची कत्तलींपासून सुटका !

गोवंशियांची अवैध वाहतूक होणार असल्याचे वृत्त पोलिसांना न कळता गोरक्षकांना अगोदर कसे कळते ? याचा पोलिसांनी विचार करून त्यावर ठोस उपाययोजना काढायला हवी, असे गोरक्षकांना वाटते.

जम्मू बस आगारामध्ये सापडली ७ किलो स्फोटके !

पुलवामा येथील आक्रमणाला २ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्‍वभूमीवर आतंकवाद्यांकडून आक्रमण करण्याचा कट रचला जात होता

मोरगाव आणि सिद्धटेक येथील माघी यात्रेस प्रारंभ !

कोरोना महामारीमुळे यावर्षी ही यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. पालखीचे देव गाडीमधून मोरगावकडे प्रस्थान झाले आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त श्री. मंदार महाराज देव यांनी दिली आहे.

सासवड येथील १२ वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन

संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, पुरस्कारांचे वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कवीसंमेलन आणि समारोप असा कार्यक्रम असेल. ‘या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संभाजीराजे यांचे कार्य समाजासमोर यावे, हा या संमेलनाचा उद्देश आहे’

सनातन संस्कृतीचे श्रेष्ठत्व आधुनिक विज्ञानाला मान्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘ज्योतिष शास्त्र नाही’, ‘आमच्याहून कितीतरी लांब असलेल्या ग्रहांचा मानवांवर परिणाम कसा होईल ?’, असा सनातन धर्माच्या विरोधकांकडून प्रचार केला जातो; परंतु आज आधुनिक विज्ञानही मान्य करते की, अमावास्या आणि पौर्णिमा यांचा मानवाच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो.

शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकार्‍यांची नेमणूक नियमबाह्य ! – औरंगाबाद खंडपिठाचा आदेश

साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य असून राज्य सरकारने त्याविषयीचे शपथपत्र सादर करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १५.२.२०२१ 

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

श्री गणेश जयंती निमित्त ‘साधनेतून समृद्धीकडे’ व्याख्यानाचे आयोजन !

‘अक्षर ऊर्जा मर्म योग‘ या संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंती निमित्त ‘साधनेतून समृद्धीकडे’ या विषयावरील याख्यान १५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ‘झूम’ प्रणालीवर आयोजित करण्यात आले आहे.

परवाना न घेता ज्वलनशील पदार्थांचा केलेला साठा जप्त !

काळभोरनगर भागात ज्वलनशील पदार्थांची साठवणूक केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून २३ लाख ६० सहस्र ३०० रुपये किमतींचे रसायनसदृश ज्वलनशील द्रवपदार्थ जप्त केले.