मोरगाव आणि सिद्धटेक येथील माघी यात्रेस प्रारंभ !

पिंपरी-चिंचवड – श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांना श्री क्षेत्र मोरगाव येथे तपश्‍चर्येतून श्री गणेशाची मूर्ती प्राप्त झाली होती. वर्षातून २ वेळा पायी पालखीतून या मूर्तीला नेण्याची प्रथा आहे. माघी यात्रा मोरगाव आणि सिद्धटेक येथे असते. ही यात्रा १४ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाली असून १९ फेब्रुवारीपर्यंत आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी ही यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. पालखीचे देव गाडीमधून मोरगावकडे प्रस्थान झाले आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त श्री. मंदार महाराज देव यांनी दिली आहे.