गोरक्षकांच्या सतर्कतेने ११ गोवंशियांची कत्तलींपासून सुटका !

गोवंशियांची अवैध वाहतूक होणार असल्याचे वृत्त पोलिसांना न कळता गोरक्षकांना अगोदर कसे कळते ? याचा पोलिसांनी विचार करून त्यावर ठोस उपाययोजना काढायला हवी, असे गोरक्षकांना वाटते.

पुणे – रायगड (ता. पोलादपूर) येथील पळचील गावातून रात्री ११ च्या सुमारास कत्तलीसाठी गोवंशियांची वाहतूक करणारी पिकअप गाडी जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने कशेडी बंगला येथे पिकअप गाडी अडवली. त्यानंतर गाडीतील ११ गोवंशियांची सुटका करण्यात आली. यातील २ गायींचा गाडीत मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले. गोरक्षक सरसेनापती हंबीरराव मोहिते, संघर्ष युवा मंच आणि श्री लक्ष्मीनारायण मित्र मंडळाचे निखिल दरेकर यांसहित अन्य कार्यकर्ते यांना वरील माहिती मिळाली होती. या प्रकरणी गणेश समजीसकर, शबाब कोंडेकर, सज्जाद आंजार्लेकर, मुराद तळघरकर, अकबर जोगीलकर या धर्मांधांना पोलिसांनी कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा नोंद करण्यास पिपल फॉर अ‍ॅनिमलचे चेतन शर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच चैतन्य सेवा संस्था येथे पकडलेल्या गोवंशियांना सोडण्यात आले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.