दिवसाला ६०० जणांचे लसीकरण करणार – पालकमंत्री

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या फेरीमध्ये जिल्ह्यातील ९ सहस्र ४३४ आधुनिक वैद्य, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.

कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १९ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गोवा राज्यातील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांतील १९ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर दिली.

अशांना फाशीची शिक्षा होणारा कायदा करा !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि कोलकाता उच्च न्यायालयातील अधिवक्ता कल्याण बॅनर्जी यांनी देवी सीतामाता यांच्याविषयी अनुद्गार काढल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या विरोधात भागधारक फौजदारी तक्रार करणार

म्हापसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या (म्हापसा अर्बन बँकेच्या) संचालकांच्या विरोधात फौजदारी तक्रार करण्याचा निर्णय पतसंस्थेच्या भागधारकांनी घेतला आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचेही ठरवण्यात आले.

शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे, ही काळाची आवश्यकता !  – अमोल बुचडे प्रशिक्षक शिवशाहू मर्दानी आखाडा, कोल्हापूर

शिवकालीन कलेचे जतन व्हावे आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे काळाची आवश्यक आहे, असे मत कोल्हापूर येथील शिवशाहू मर्दानी आखाड्याचे प्रशिक्षक अमोल बुचडे यांनी केले.

हिंदु धर्माला राजाश्रय मिळाल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

‘आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंना धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल.

तिसरे महायुद्ध झाल्यास त्याला उत्तर देण्यास भारत सक्षम ! – तज्ञांचे मत

या चर्चासत्रात सर्व मान्यवरांनी मत व्यक्त करतांना ‘तिसर्‍या महायुद्धात भारत सक्षमपणे लढा देऊ शकेल’, असे सांगितले. हा कार्यक्रम फेसबूक आणि यू ट्यूब यांच्या माध्यमांतून ४१ सहस्र ४६७ हून अधिक जणांनी प्रत्यक्ष पाहिला.

‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर हिंदु धर्म आणि महिला यांच्यावरील अश्‍लील पुस्तकांची विक्री : एक सुनियोजित षड्यंत्र !

या पुस्तकांच्या शीर्षकांवरून असे वाटते की, हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांची मानहानी करणे, हाच यामागील मूळ हेतू आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मंदिरातील कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये आलेल्या अडचणी आणि त्यांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय करून केलेले निराकरण

‘हिंदु जनजागृती समिती’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त एक ‘ऑनलाईन’ परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय.