अभाविपच्या मडगाव शाखेच्या वतीने येथील स्वामी विवेकानंद यांच्या खोलीस भेट

१२ जानेवरीला युवक दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती यांनिमित्त अभाविपच्या वतीने भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अभाविपच्या मडगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी यंदा दामोदर साल कोंब येथे हा कार्यक्रम साजरा केला

जगातील ९ देशांकडून भारताकडे स्वदेशी कोरोना लसीची मागणी !

भारताने कोरोनावरील स्वदेशी लसीची निर्मिती केली असून त्याच्या आपत्कालीन वापराला अनुमती दिली आहे. यानंतर जगातील ९ देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे.

पेडणे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत वसलेली मुरमुसे, तुये येथील श्री सटीदेवी !

पेडणे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत वसलेली मुरमुसे, तुये येथील श्री सटीदेवीची जत्रा १२ जानेवारी २०२१ या दिवशी आहे. ही देवी नवसाला पावणारी आणि सर्वांचे रक्षण करणारी आहे. श्री सटीदेवीच्या बाजूला श्री महालक्ष्मीदेवीचीही मूर्ती आहे.

गोव्यातील ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताची बांगलादेशसमवेत अधिक प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण

बांगलादेशसमवेत सांस्कृतिक देवाणघेवाण करतांना तेथील मूलनिवासी हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य देणे आणि केवळ हिंदु म्हणून त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखणे शक्य व्हावे, ही अपेक्षा !

रंगकाम करण्यासाठी गायीच्या शेणापासून बनवलेले वेदिक रंगांचे आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

गायीचे शेण मिळण्यासाठी प्रथम गायी जिवंत रहाणे आवश्यक आहे.

धारबांदोडा, उसगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

धारबांदोडा येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अब्दुल सय्यद या धर्मांधाला पोलिसांनी १० जानेवारी या दिवशी मडगाव रेल्वेस्थानकावर अटक करून त्या मुलीची सुटका केली.

(म्हणे) ‘भारताकडून कालापानी, लिपुलेख आदी भाग परत घेणार !  

ओली यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप, वाढती बेरोजगारी आणि सरकारची अकार्यक्षमता यांवरून टीका होत असल्याने ते लपवण्यासाठी ओली भारतासमवतेच्या सीमावादाचे सूत्र उपस्थित करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

निधन वार्ता 

सनातनच्या साधिका सौ. संगिता मर्दा यांचे वडील बद्रीनारायण शंकरलाल करवा (वय ८४ वर्षे) यांचे १० जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, १ सून, २ मुली, २ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

उदासीनता घालवून कार्यप्रवृत्त करणारा आणि राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा स्वामी विवेकानंद यांचा आध्यात्मिक संदेश !

‘सद्यःकाळात श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सिंहगर्जनेने कथन करा ! त्याचे बासरीवादन आणि अन्य लीला सांगून राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण होत नाही.

अवैध धंद्यांशी निगडित असलेल्या उमेदवाराला मतदारांनी नाकारावे !

‘अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशांचा वापर करून निवडणुका जिंकून अवैध धंदे राजरोसपणे चालवण्याची त्यांना अनुमती मिळणार नाही’, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यायची आहे, असे ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’ने म्हटले आहे.