‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये आलेल्या अडचणी आणि त्यांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय करून केलेले निराकरण

‘हिंदु जनजागृती समिती’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये आलेल्या अडचणी आणि त्यांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय करून केलेले निराकरण

‘हिंदु जनजागृती समिती’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त २२ ऑक्टोबर २०२० या दिवशी सायंकाळी ७ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक ‘ऑनलाईन’ परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये विविध प्रकारच्या अडचणी आल्या. यांमागे आध्यात्मिक कारण असल्यास त्यांच्या निवारणार्थ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना नामजपादी उपाय विचारण्यात आले. त्यांनी सांगितलेले उपाय कधी त्यांनी स्वतः किंवा सनातनच्या अन्य संतांनी केले. त्या संदर्भातील वृत्तांत येथे दिला आहे.

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. परिसंवादात अडथळे येऊ नयेत म्हणून त्याच्या आदल्या आणि त्या दिवशी (अनुक्रमे २१ आणि २२ ऑक्टोबर) संतांना करायला सांगितलेले उपाय

परिसंवादाच्या आदल्या दिवशी आणि परिसंवादाच्या दिवशी पुढील उपाय देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील पू. शिवाजी वटकरकाका आणि पू. गुरुनाथ दाभोलकरकाका यांनी केले.

१ अ. जप : महाशून्य

१ आ. न्यास : हाताचा तळवा नाक आणि तोंड एकत्र झाकले जाईल असा शरिरापासून १ – २ सेंटिमीटर अंतरावर धरावा.

१ इ. कालावधी : २ घंटे

हा जप पूर्ण करूनही कार्यक्रमात काही अडचणी आल्या. त्यांचा वृतांत पुढे दिला आहे.

२. परिसंवादाच्या दिवशी आलेल्या अडचणी आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

२ अ. थेट प्रक्षेपणाच्या सेवेत ‘नेट’ची अडचण येणे : या परिसंवादासाठी कोल्हापूर येथील श्री. अनमोल करमळकर हे ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची सेवा करणार होते; पण त्यांच्याकडे, म्हणजे त्यांच्या घरी कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापासून ‘नेट’ची अडचण येत होती.

२ अ १. केलेला उपाय

२ अ १ अ. जप : शून्य

२ अ १ आ. न्यास : हाताचा तळवा नाकासमोर १ – २ सेंटिमीटर अंतरावर धरला.

२ अ १ इ. कालावधी : १० – १५ मिनिटे (त्यानंतर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना अडथळा दूर झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी उपाय थांबवून थेट प्रक्षेपणाची सेवा करणारे कोल्हापूर येथील श्री. अनमोल करमळकर यांना त्याविषयी विचारायला सांगितले.)

२ अ २. उपायांचा परिणाम : उपायांनंतर ‘केबल’ची ‘वायर’ तुटली असल्याचे लक्षात आले. ‘नेट’ न मिळण्यामध्ये नेमकी अडचण काय आहे ?’, हे उपाय केल्यामुळे लक्षात आले. आधी कितीतरी वेळ ते लक्षात येत नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठीचा ‘सेट अप’ जळगाव येथे करण्याचा निर्णय घेता आला.

२ आ. परिसंवादाला सायंकाळी ७ वाजता आरंभ झाल्यानंतर ३ मिनिटांनी थेट प्रक्षेपण होण्यामध्ये अडथळा आल्याचे लक्षात येणे

२ आ १. सद्गुरु गाडगीळकाकांनी केलेले उपाय

२ आ १ अ. पहिला उपाय

१. जप : महाशून्य

२. न्यास : उजव्या हाताचा तळवा तोंडासमोर धरला

३. कालावधी : २ मिनिटे

२ आ १ आ. दुसरा उपाय : अजूनही सद्गुरु गाडगीळकाकांना अडथळा पूर्णपणे दूर झाल्याचे जाणवले नाही. त्यामुळे त्यांनी सूक्ष्मातून शोधल्यावर त्यांना त्यांच्या डोक्यावर वरच्या दिशेकडून त्रासदायक स्पंदने येत असल्याचे जाणवले. ही त्रासदायक स्पंदने परिसंवादाचे प्रक्षेपण न होण्यासाठी अनिष्ट शक्तींनी प्रक्षेपित केलेली त्रासदायक शक्ती होती. ही त्रासदायक शक्ती दूर होण्यासाठी त्यांनी त्यांच्या डोक्यावर उजव्या हाताचा तळवा डोक्याच्या दिशेने १ – २ सें.मी. अंतरावर धरला आणि त्यावर डाव्या हाताचा तळवा पालथा, म्हणजे आकाशाच्या दिशेने करून ठेवला. त्यांनी ही मुद्रा करून ‘महाशून्य’ हा जप २ मिनिटे केला. त्यानंतर त्यांना वरच्या दिशेकडून त्रासदायक स्पंदने येणे थांबल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ते उपाय करणे थांबवले.

२ आ १ इ. तिसरा उपाय

१. जप : ‘ह्रां, ह्रीं, ह्रूं, ह्रैं, ह्रौं, ह्रः ।’ (देवीचे बीजमंत्र)

२. मुद्रा : तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक जुळवणे

३. कालावधी : १ मिनिट

२ आ २. परिणाम : अशा प्रकारे एकूण ५ मिनिटे मंत्रजप केल्यावर परिसंवादाचे थेट प्रक्षेपण होण्यास आरंभ झाला.

२ इ. सायंकाळी ७.१० वाजता ‘ऑनलाईन’ परिसंवाद ऐकण्यासाठी जोडलेल्या दर्शकांची संख्या ५४० वरून अचानक १४० वर येणे

१. सद्गुरु गाडगीळकाकांना ही अडचण सांगितल्यावर त्यांनी ‘अडचण सुटेल’, असे केवळ सांगितले असता दर्शक संख्या वाढण्यास आरंभ झाला आणि दर्शक संख्या ८६६ वर गेली.

२. आणखी ५ मिनिटांनी पुन्हा दर्शक संख्या अचानक १०० वर आली आणि परिसंवाद दिसण्यामध्येही मधे मधे अडथळा येत होता. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाकांना डोळ्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आल्याचे जाणवले. त्यांनी ते आवरण काढून डोळ्यांसमोर १ – २ सें.मी. अंतरावर तळहात ठेवून ‘महाशून्य’ हा जप २ मिनिटे केला. त्यानंतर त्यांना तो त्रास दूर झाल्याचे जाणवले. त्या वेळी खरोखरच दर्शक संख्या वाढण्यास आरंभ झाला.’

– श्री. अरुण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक