सिंधुदुर्ग – शिवकालीन कलेचे जतन व्हावे आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे काळाची आवश्यक आहे, असे मत कोल्हापूर येथील शिवशाहू मर्दानी आखाड्याचे प्रशिक्षक अमोल बुचडे यांनी केले. वैभववाडी येथे ‘आम्ही वैभववाडीकर’ आयोजित शिवकालीन खेळ प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी वैभववाडी येथील उद्योजक विकास काटे यांच्यासह अन्यही मान्यवर उपस्थित होते.
वैभववाडी आणि करूळ येथे हे प्रशिक्षण १ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. यामध्ये भैया कदम यांनी करूळ आणि वैभववाडी येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये तलवारबाजी, भालाफेक, काठीफेक, लिंबू मारणे आणि युद्धकलेचे इतर सर्व प्रकार यांचे प्रशिक्षण देण्यात आले.