म्हापसा – म्हापसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या (म्हापसा अर्बन बँकेच्या) संचालकांच्या विरोधात फौजदारी तक्रार करण्याचा निर्णय पतसंस्थेच्या भागधारकांनी घेतला आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचेही ठरवण्यात आले. १० जानेवारीला येथे झालेल्या भागधारक आणि खातेधारक यांच्या या बैठकीत कर्जबुडव्यांच्या नावाची सूची आणि इतर माहिती १० दिवसांत उपलब्ध न केल्यास संचालक मंडळातील सदस्यांना त्यांच्या घरी किंवा कार्यालयात घेराव घालण्याचेही ठरले. बँक लॉकरची समस्याही सोपी नियमावली वापरून सोडवावी. पतसंस्थेचे २ लाख खातेधारक असून त्यांची एकूण रक्कम ३५५ कोटी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतसंस्थेची अनुज्ञप्ती १६ एप्रिल २०२० या दिवशी रहित केली होती.