अ.भा.वि.प.च्या वतीने एम्.बी.बी.एस्.च्या प्रथम वर्ष परीक्षेच्या परिपत्रकाची होळी

एम्.बी.बी.एस्.च्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने २ डिसेंबर या दिवशी टिळक चौक येथे एम्.बी.बी.एस्.च्या प्रथम वर्ष परीक्षेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि वाहतूक प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत बेवारस ४१ वाहने जप्त

महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी अल्प व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे यासाठी महानगरपालिका प्रशासन अन् वाहतूक शाखा यांच्या वतीने केलेल्या संयुक्त कारवाईत दिवसभरात ४१ वाहने जप्त करण्यात आली.

पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकांत संतप्त प्रवाशांचे रेल्वे बंद आंदोलन

डहाणूहून चर्चेगेटकडे सुटणारी पहाटेची पहिली लोकल रहित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात प्रवाशांनी रेल्वे बंद आंदोलन पुकारले.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद

अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आंबेडकरनगर परिसरातील एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्रीरायगडच्या दर्शनाला सायकलवरून रवाना !

किल्ले श्री रायगडच्या दर्शनाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रताप घाडगे आणि जेष्ठ धारकरी श्री. ईश्‍वर शिरटीकर सायकलवरून रायगडच्या दर्शनासाठी रवाना !

अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफ्.डी.ए.) पुणे विभागात पावणेचार कोटींचा अन्नसाठा जप्त

नागरिकांच्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन कोरोना काळातच नव्हे, तर नियमितपणे एफ्.डी.ए.कडून अशी मोहीम राबवली जावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

रस्त्यावर कचरा टाकणारे आणि थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई ! – कोल्हापूर महानगरपालिकेचा निर्णय

रस्त्यावर कचरा टाकणारे तसेच थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्यावर कचरा टाकल्याचे आढळल्यास जागेवरच १५० रुपये, तर थुंकल्यास १०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

आष्टा-ईश्‍वरपूर रस्त्यावरील खड्ड्यांनी पुन्हा घेतला एकाचा बळी !

नागरिकांनी वारंवार मागणी करूनही रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष घेतला एकाचा बळी ! दोषी अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झालाच पाहिजे अशी मागणी !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घाला ! – सुफी इस्लामिक बोर्डाची पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी

हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटनांकडून आतापर्यंत या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी होत असतांना आता मुसलमानांच्या धार्मिक संघटनेकडून अशी मागणी होत आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घेऊन लवकरात लवकर पीएफआय’वर बंदी घालावी !