कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि वाहतूक प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत बेवारस ४१ वाहने जप्त

कल्याण – येथील महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी अल्प व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे यासाठी महानगरपालिका प्रशासन अन् वाहतूक शाखा यांच्या वतीने केलेल्या संयुक्त कारवाईत दिवसभरात ४१ वाहने जप्त करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. ‘जप्त करण्यात आलेली वाहने सोडवण्यासाठी वाहनचालकांना दंड भरावा लागणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी, तसेच रस्त्यावर, रस्त्यालगत उभी असलेली बेवारस, भंगार वाहने उचलण्याची ही कारवाई यापुढेही चालू रहाणार आहे’, असे वाहतूक शाखेचे अधिकारी सुखदेव पाटील यांनी सांगितले.