ठाणे, २ डिसेंबर (वार्ता.) – पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकांत २ डिसेंबर या दिवशी सकाळी संतप्त प्रवाशांनी रेल्वे बंद आंदोलन केले. डहाणूहून चर्चेगेटकडे सुटणारी पहाटेची पहिली लोकल रहित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात प्रवाशांनी रेल्वे बंद आंदोलन पुकारले. या वेळी प्रवाशांनी मुंबईकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस रोखून धरली होती. ‘पालघर रेल्वे स्थानक मास्तरांनी प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन मध्य मुंबई येथे (मुंबई सेंट्रल) पाठवण्यात येईल आणि प्रवाशांच्या मागण्यांवर विचार करण्यात येईल’, असे आश्वासन दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकांत संतप्त प्रवाशांचे रेल्वे बंद आंदोलन
पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकांत संतप्त प्रवाशांचे रेल्वे बंद आंदोलन
नूतन लेख
- Karnataka Ganapati Procession Violence : मंड्या (कर्नाटक) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर पेट्रोल बाँबद्वारे आक्रमण !
- Bengal Doctors Strike Continues : कनिष्ठ डॉक्टरांचा संप चालूच !
- Manipur Unrest Escalates : मणीपूरमधील संघर्ष चिघळला !
- Guwahati IIT Student Suicide : गौहत्ती येथील आयआयटीच्या विद्यार्थ्याची वसतीगृहात आत्महत्या; वर्षभरातील चौथी घटना
- No Cricket With Bangladesh : भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका रहित करा ! – हिंदूंची जोरदार मागणी
- President Rule For Delhi : केजरीवाल सरकार विसर्जित करून देहलीत राष्ट्रपती राजवट लागू करा ! – भाजप