श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्रीरायगडच्या दर्शनाला सायकलवरून रवाना !

श्रीरायगडच्या दर्शनाला जाणार्‍या धारकर्‍यांना शुभेच्छा देतांना श्री. नितीन चौगुले (मध्यभागी टोपी आणि पिवळा सदरा घातलेले) आणि धारकरी

सांगली – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रताप घाडगे आणि जेष्ठ धारकरी श्री. ईश्‍वर शिरटीकर १ मासांपूर्वी दुचाकीवरून किल्ले श्री रायगडच्या दर्शनाला गेले होते. कोरोनाचे कारण पुढे करत त्यांना दर्शनासाठी आत सोडले नाही. त्या वेळी त्यांनी महाद्वारात गड चालू झाला की सायकलवरून दर्शनाला येईन, अशी प्रतिज्ञा केली होती. ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी श्री. प्रताप घाडगे, श्री. ईश्‍वर शिरटीकर आणि त्यांचे सहकारी २ डिसेंबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता शिवतीर्थ, मारुति चौक येथून सायकलवरून रायगडच्या दर्शनासाठी रवाना झाले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी श्रीफळ वाढवून धारकर्‍यांना शुभेच्छा दिल्या.