सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सामाजिक माध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

अमेरिकेत शिक्षण घेणारी आणि सध्या घरी आलेली येथील सुदीक्षा भाटी हिचा टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. गरीब कुटुंबातील असलेल्या सुदीक्षा हिने अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळवली होती आणि तेथे ती शिकत होती.

वर्ष २००५ नंतर जन्म झालेल्या मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट या दिवशी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये ‘वर्ष २००५ नंतर जन्म झालेल्या मुलींनाही वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे समान वाटा देण्यात यावा’, असे सांगितले.

सावंतवाडी शहरात आज दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार

सावंतवाडी शहरात प्रतीवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. विविध मंडळांच्या माध्यमातून शहरात २० हून अधिक हड्या बांधल्या जातात; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने १२ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.

हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची स्थापना

हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय विद्यालय मांडवीचे प्राचार्य रवि प्रताप सिंह यांची, तर दाबोळी येथील स्पेक्ट्रम करिअर अकादमीचे निर्देशक डॉ. कमलेश मिश्रा यांची सरचिटणीसपदी निवड झालेली आहे.

कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात ५० बळी

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ७० हून अधिक जणांचे निधन झाले आहे आणि यामधील मुरगाव तालुक्यातील ५० जण आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील २३ डॉक्टर कोरोनाबाधित

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत २३ डॉक्टर आणि १३ परिचारिका कोरोनाबाधित झालेे आहेत. मडगाव येथील कोरोना रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्यापेक्षा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या अधिक आहे.

मुसलमानांना मिळालेल्या ५ एकर भूमीवर मशीद नाही, तर संशोधन केंद्र आणि ग्रंथालय उभारणार ! – सुन्नी वक्फ बोर्डाची अधिकृत घोषणा

श्रीरामजन्मभूमी खटल्याच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांना दिलेल्या ५ एकर भूमीवर बाबर किंवा अन्य कुणाच्याही नावावर कोणतीही मशीद किंवा रुग्णालय बनवण्यात येणार नाही, तर तेथे संशोधन केंद्र आणि ग्रंथालय उभारण्यात येणार आहे…

केरळ येथील विमान अपघातात मूत्यू झालेल्या २ वैमानिकांमध्ये मुंबईचे दीपक साठे

केरळच्या कोझिकोड विमानातळाच्या धावपट्टीवरून एअर इंडियाचे विमान घसरून २ वैमानिकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईतील वैमानिक दीपक साठे हे होते. दीपक साठे हे कुशल लढाऊ वैमानिक होते. १५ वर्षांपासून ते एअर इंडियामध्ये वैमानिक होते.