वर्धा येथील बंदीवानाची जिल्हा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील आरोपी गोपीचंद डहाके (वय ३८ वर्षे) याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा दिली होती. त्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ६ ऑगस्ट या दिवशी पहाटेच्या सुमारास बंदीवान डहाके याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सामाजिक प्रसिद्धीमाध्यमांवर बनावट फोलोअर्स वाढवल्याप्रकरणी गायक बादशहा यांची पोलिसांकडून चौकशी

इन्स्टाग्रामवर ६ लाख चाहते असलेले गायक आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया तथा बादशहा यांची ६ ऑगस्ट या दिवशी गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने चौकशी केली.