पू. दीक्षितआजोबा यांच्या देहत्यागाची स्वप्नाच्या माध्यमातून मिळालेली पूर्वसूचना आणि पू. वामन यांनी ‘पू. आजोबा नारायणाकडे (परात्पर गुरु डॉक्टरांकडे) गेले’, असे सांगणे

पहाटे मला स्वप्नात दिसले, ‘एका ठिकाणी पुष्कळ साधक एकत्रित झाले आहेत . . . ‘ही कुणाच्या अंत्यविधीची सिद्धता चालू आहे ?’ हे पाहून मला भीती वाटली नाही. अंत्यविधीचे दृश्य असूनही मनाला चांगले वाटत होते. यावरून मला वाटले, ‘ते एखाद्या उन्नतांच्या अंत्यविधीची सिद्धता करत आहेत.’