हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची स्थापना

हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय विद्यालय मांडवीचे प्राचार्य रवि प्रताप सिंह यांची, तर दाबोळी येथील स्पेक्ट्रम करिअर अकादमीचे निर्देशक डॉ. कमलेश मिश्रा यांची सरचिटणीसपदी निवड झालेली आहे.

कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात ५० बळी

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ७० हून अधिक जणांचे निधन झाले आहे आणि यामधील मुरगाव तालुक्यातील ५० जण आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील २३ डॉक्टर कोरोनाबाधित

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत २३ डॉक्टर आणि १३ परिचारिका कोरोनाबाधित झालेे आहेत. मडगाव येथील कोरोना रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्यापेक्षा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या अधिक आहे.